कोबी वर्गीय पिके | कीड नियंत्रण |

 कोबी वर्गीय पिके

कीड नियंत्रण 

⭕️ काळी माशी 

माशी पानांच्या पेशीत अंडी घालते. अंड्यातून निघालेली काळ्या रंगाची अळी पाने खाते. मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्यास, पाने खाऊन फक्त शिरा शिल्लक राहतात. अळ्यांना स्पर्श केला किंवा झाड हलवले तर ताबडतोब खाली पडतात. 

⚔️ नियंत्रण 

👉अळ्या गोळा करून रॉकेलमिश्रित पाण्यात टाकाव्यात. 

⭕️ मावा 

हिरव्या किंवा काळ्या रंगाचे मावा कोवळ्या पानातील अन्नरस शोषतात. त्यामुळे पाने सुरकुतल्यासारखी होऊन पिवळी पडतात, वाळून जातात. मावा शरीरातून चिकट पदार्थ बाहेर टाकतात. हा पदार्थ पानावर साठून राहिल्याने पाने चिकट व तेलकट दिसतात. त्यावर काळी बुरशी वाढते. परिणामी, प्रकाशसंश्‍लेषण क्रिया मंदावते. झाडांची वाढ खुंटून उत्पादनात घट येते. 

⚔️ नियंत्रण 

👉 निंबोळी अर्क ५% किंवा अॅझाडिरॅक्‍टीन (३०० पीपीएम) ५ मि.लि. प्रति लिटर पाणी फवारणी 

⭕️ चौकोनी ठिपक्‍यांचा पतंग 

अळी पानाच्या खालील बाजूस राहून पानाला छिद्रे पाडून हरितद्रव्य खाते. मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्यास संपूर्ण पाने खाऊन त्यांची चाळण करते. पानांना फक्त शिराच शिल्लक राहतात. 

⚔️ नियंत्रण 

👉 शेतात पक्षी बसण्यासाठी काठीचे मचाण लावावे. 

👉 एकरी ५ फेरोमोन सापळे (झायलो ल्यूर) लावावेत. 

👉 अळ्या दिसू लागताच, नियंत्रणासाठी फवारणी (प्रति लिटर पाणी) 

पहिली फवारणी, २ अळ्या/ रोप दिसू लागताच, बी.टी. १ ग्रॅम संध्याकाळच्या वेळी 

दुसरी फवारणी, निंबोळी अर्क ५% किंवा   अॅझाडिरॅक्‍टीन (३०० पीपीएम) ५ मि.लि. 

तिसरी फवारणी,  इंडोक्‍साकार्ब १ मि.लि. किंवा स्पिनोसॅड (२.५ एससी) १ मि.लि. 

आवश्यकतेनुसार चौथी फवारणी, क्‍लोरअॅन्ट्रानिलीप्रोल (१८.५ एससी) ०.२ मि.लि.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post