हळद
हळद जाती
✨ फुले स्वरूपा: कालावधी २५५ दिवस, ५०-५५ ग्रॅमपर्यंत वजनाचे मध्यम गड्डे, सरळ व लांब वाढणारी ३५-४० ग्रॅम वजनाची प्रत्येक कंदात ७-८ हळकुंडे, बियाणे उत्पादन प्रमाण १.५, गाभ्याचा रंग पिवळसर, कुरकुमीनचे प्रमाण जास्त (५.१९ टक्के), उतारा २२ टक्के, ओल्या हळदीचे उत्पादन ३५८.३० क्विंटल/ हेक्टर, वाळलेल्या हळदीचे उत्पादन ७८.८२ क्विंटल/ हेक्टर, पानावरील करपा व कंदमाशीस प्रतिकारक.
✨ सलम: कालावधी २७० दिवस, जाड व ठसठशीत हळकुंडे उपहळकुंडे, हळकुंडाची साल पातळ, गाभ्याचा रंग गर्द पिवळा, ओल्या हळदीचे उत्पादन ३५०-४०० क्विंटल/ हेक्टर, वाळलेल्या हळदीचे उत्पादन ७०-८० क्विंटल/ हेक्टर, करपा रोगास बळी पडते.
✨ राजापुरी: हळकुंडे व उपहळकुंडे आखूड, जाड व अंगठ्यासारखी ठसठशीत, हळकुंडाची साल पातळ, गाभ्याचा रंग पिवळा ते गर्द पिवळा, उतारा १८-२० टक्के, ओल्या हळदीचे उत्पादन २४०-२५० क्विंटल/हेक्टर, वाळलेल्या हळदीचे उत्पादन ४५-५० क्विंटल/ हेक्टर, करपा रोगास बळी पडते.
इतर जाती
✨ कृष्णा: कडप्पा जातीसारखे गुणधर्म, कुरकुमीनचे प्रमाण २.५ टक्के, वाळलेल्या हळदीचे उत्पादन ७५-८० क्विंटल/ हेक्टर, करपा रोगास बळी पडते.
✨ वायगाव: उतारा २०-२१ टक्के, हळकुंडे लांब व प्रमाणबद्ध, गाभा गर्द पिवळा, ओल्या हळदीचे उत्पादन २६५-२७० क्विंटल/ हेक्टर, वाळलेल्या हळदीचे उत्पादन ५२-५५ क्विंटल/ हेक्टर
✨ आबे हळद: पक्वता कालावधी २२५ दिवस, कच्च्या आंब्यासारखा सुवास, लोणच्यामध्ये व औषधी उपयोग, हळद दिसायला इतर जातीप्रमाणेच; परंतु गाभा फिकट पिवळा, पांढरट.