खोडवा ऊस पीक संरक्षण

 खोडवा ऊस

पीक संरक्षण 


👉 खोडवा पिकामध्ये काणी व गवताळ वाढीचे प्रमाण जास्त आढळते. त्यासाठी अशी काणीग्रस्त बेटे व गवताळ वाढीची बेटे समूळ उपटून नष्ट करावीत. 

👉 मार्च-एप्रिलमध्ये तुटलेल्या ऊसाचा खोडवा ठेवल्यास खोडकिडीचा प्रादुर्भाव जास्त दिसतो. खोडवा ऊसामध्ये खोड किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास, एकरी दोन ट्रायकोकार्डची दहा ते पंधरा दिवसांच्या अंतराने तीनवेळा प्रसारणे करावीत. क्लोरॲन्ट्रानिलीप्रोल (१८.५ एससी) ०.३७५ मि.लि. किंवा क्लोरपायरीफॉस (२० ईसी) २ मि.लि. प्रति लिटर पाणी प्रमाणे फवारणी करावी. अन्यथा क्लोरॲन्ट्रानिलीप्रोल (०.४ जीआर) ७.५ किलो किंवा फिप्रोनिल (०.३ जीआर) १० किलो प्रति एकर प्रमाणे जमिनीत वाफसा असताना समप्रमाणात मिसळून द्यावे. 

👉 हुमणीच्या नियंत्रणासाठी वळवाचा पहिला पाऊस झाल्यानंतर कडुनिंब, बाभूळ व बोर या झाडावरील भुंगेरे प्रकाश कंदील व रॉकेलचा वापर करून सामुदायिकरित्या रात्रीच्या वेळी गोळा करून नष्ट करावेत. हुमणीग्रस्त क्षेत्रात प्रति एकरी फिप्रोनिल (०.३ जीआर) ८ किलो सरीमध्ये शेणखतामधून द्यावे. नंतर हलके पाणी द्यावे. 

👉 कांडी किडीच्या नियंत्रणासाठी एकरी दोन ट्रायकोकार्ड्स मोठ्या बांधणीनंतर दर पंधरा दिवसांनी आवश्यकतेनुसार ऊस तोडणीअगोदर एक महिन्यापर्यंत वापरावीत.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.





Post a Comment (0)
Previous Post Next Post