पूर्वहंगामी ऊस
पक्क्या भरणीयोग्य १६ ते २० आठवडे वयाच्या उसात आंतरपिके घेतली असल्यास त्यांची काढणी करावी. पहारीच्या साह्याने सरीचे वरंबे फोडून उर्वरित रासायनिक खतांची मात्रा प्रति एकरी ५५ किलो नत्र (११९ किलो नीमकोटेड युरिया), ३४ किलो स्फुरद (२१२ किलो सिंगल सुपर फॉस्फेट) आणि ३४ किलो पालाश (५६ किलो म्युरेट ऑफ पोटॅश) या प्रमाणात द्यावी. खतमात्रा एकत्र चांगली मिसळून सऱ्यांच्या संख्येत विभागून द्यावी. खते दिल्यानंतर रिजरने भरणी करावी व रानबांधणी करून लगेच पाणी द्यावे. को-८६०३२ ही जात अधिक उत्पादनक्षम असल्याने रासायनिक खतांच्या वाढीव मात्रेस प्रतिसाद देते. यासाठी खतमात्रा एकरी २५ टक्के जादा द्यावी.