पशु संवर्धन :-
गोठ्यातील हवा खेळती ठेवावी. गोठ्यामध्ये छतावर पंखे न लावता एका बाजूने पंखा व एका बाजूने एक्झॉस्ट पंखा लावल्यास हवेचा झोत तयार होऊन गोठ्यातील गाईंना थंडावा मिळू शकतो. पत्र्याखाली किंवा छताखाली पंखे लावल्यास वरील गरम हवा जनावरांना लागून, त्यांना अजून त्रास होऊ शकतो. तीव्र सूर्य किरणांपासून जनावरांचे संरक्षण करावे. मुक्त संचार गोठयामध्ये कडूलिंब किंवा बदामासारखी दाट सावली देणारी झाडे असल्यास उन्हाचा ताण काही प्रमाणात कमी करता येतो. दहा लिटर पाण्यामध्ये २०० ग्रॅम गूळ, २५ ग्रॅम मीठ व एक लिंबू पिळून घ्यावे. हे द्रावण तयार करून दिवसातून एक ते दोनवेळेस जनावरांना पाजावे किंवा जीवनसत्व ‘क’ युक्त पूरक द्यावे. म्हणजे उन्हाचा ताण कमी होण्यास मदत होते.