कांदा-लसूण :कांदा साठवणुकीसाठी काढणीपूर्व व्यवस्थापन
खरिपात तयार होणाऱ्या जातींचा कांदा एक महिन्यापेक्षा जास्त टिकत नाही. रब्बी (उन्हाळ) हंगामात तयार होणाऱ्या जातींचे कांदे पाच महिने साठवणीत टिकतात. त्यातही जातीपरत्वे बराच फरक पडतो. एन २-४-१, ॲग्रिफाऊंड लाईट रेड, अर्का निकेतन या जाती सहा महिने साठवणीत विशेष घट न होता चांगल्या टिकू शकतात. भीमा किरण, भीमा शक्ती या नवीन जातीदेखील साठवणीत चांगल्या टिकतात.
खते आणि पाणी नियोजन
Ø खतमात्रा, प्रकार तसेच पाणी नियोजन यांचा साठवणीवर परिणाम होतो.
Ø शक्य
होईल तेवढे नत्र सेंद्रिय खतामधून द्यावे. सर्व नत्र लागवडीनंतर दोन महिन्यांच्या
आत द्यावे. उशिरा नत्र दिल्यास माना जाड होतात, कांदा टिकत नाही.
Ø पालाशमुळे
साठवणक्षमता वाढते. रब्बी कांद्यासाठी पालाशची मात्रा वाढवावी.
Ø गंधकासाठी
अमोनियम सल्फेट, सल्फेट ऑफ पोटॅश किंवा सिंगल
सुपर फॉस्फेटचा वापर केल्यास गंधकाची गरज आपोआप पूर्ण केली जाते; परंतु अलीकडे संयुक्त दाणेदार खतांचा वापर होत असल्यामुळे त्यातून फक्त
नत्र, स्फुरद व पालाश हीच अन्नद्रव्ये मिळतात. म्हणून
गंधकासाठी गंधकयुक्त खत लागवडीपूर्वी देणे साठवण चांगली होण्यासाठी आवश्यक आहे.
Ø पाणी
देण्याची पद्धत, पाण्याचे प्रमाण याचा परिणाम
साठवणीवर होतो. कांदा पिकाला पाणी कमी; परंतु नियमित
लागते. कंद पोसत असताना एकाचवेळी भरपूर पाणी दिल्यास माना जाड होतात. जोड
कांद्यांचे प्रमाण वाढते.
Ø काढणीअगोदर
दोन ते तीन आठवडे पाणी बंद करावे.
Ø कांद्याच्या
५० ते ७० टक्के माना पडल्यानंतर काढणी करावी.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/