एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन
माती परीक्षण करून संतुलित प्रमाणात खते वापरावीत. माती परीक्षणानुसार खतांच्या मात्रांमध्ये बदल करावेत.
✨सेंद्रिय खते - प्रति एकरी ८ टन शेणखत व ८० किलो निंबोळी पेंड
✨जैविक खते – प्रति एकरी २ किलो ॲझोटोबॅक्टर, २ किलो स्फुरद विरघळविणारे जीवाणू (पी.एस.बी.) व २ किलो पालाश उपलब्ध करणारे जीवाणू (के.एम.बी.) हे सर्व १ टन शेणखतात मिसळून द्यावे.
✨सेंद्रिय खते - प्रति एकरी ८ टन शेणखत व ८० किलो निंबोळी पेंड
✨रासायनिक खते - मध्यम प्रकारच्या जमिनीस संकरीत वाणासाठी एकरी १२० किलो नत्र, ६० किलो स्फुरद व ६० किलो पालाश द्यावे. खते देताना निम्मे नत्र, संपूर्ण स्फुरद आणि पालाश लागवडीच्या वेळी द्यावे. राहिलेले निम्मे नत्र १५, २५, ४० व ५५ दिवसांनी समान हप्त्यांमध्ये विभागून बांगडी पद्धतीने झाडाच्या बुंध्यापासून थोड्या अंतरावर मुळाच्या क्षेत्रात द्यावे. खते दिल्यानंतर ताबडतोब पाणी द्यावे.
याशिवाय प्रति एकरी १० किलो फेरस सल्फेट, ८ किलो झिंक सल्फेट, ४ किलो मॅंगेनीज सल्फेट, २ किलो बोरॅक्स आणि १० किलो मॅग्नेशियम सल्फेट ही सूक्ष्म आणि दुय्यम अन्नद्रव्ये लागवडीनंतर ५ ते ७ दिवसांनी द्यावीत.
✨जैविक खते – प्रति एकरी २ किलो ॲझोटोबॅक्टर, २ किलो स्फुरद विरघळविणारे जीवाणू (पी.एस.बी.) व २ किलो पालाश उपलब्ध करणारे जीवाणू (के.एम.बी.) हे सर्व १ टन शेणखतात मिसळून द्यावे.