कलिंगड, खरबूज पिकामध्ये ‘वॉटरमेलॉन बड नेक्रॉसीस व्हायरस’ या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास वेलीचा शेंडा तपकिरी पडून शेवटी काळा होतो आणि वेल जळते. वेलीवर शेंड्याकडून खोडाकडे तपकिरी रोगाचे चट्टे पडतात. या रोगाचा प्रादुर्भाव फळांवर येऊन त्यावर सुद्धा गोलाकार वर्तुळे दिसतात. या विषाणूजन्य रोगाचा प्रसार फुलकिडे (थ्रीप्स) आणि स्पर्शाने होतो.
⭕ व्यवस्थापन
- रोग प्रतिबंधक जातीचे प्रमाणित बियाणे वापरावे.
- रोगट झाड व सहजीवी तणे उपटून जाळून नष्ट करावीत.
- एकरी ५ निळे चिकट सापळे लावावेत.
- रोगाचा प्रसार करणाऱ्या फुलकिडींच्या नियंत्रणासाठी, पुनर्लागवडीनंतर १० ते १५ दिवसांच्या अंतराने फिप्रोनिल (५ एससी) १.५ मि.लि. किंवा कार्बोसल्फान (२५ ईसी) १ मि.लि. किंवा थायमिथोक्झाम (२५ डब्ल्यूजी) ०.४ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी आवश्यकतेनुसार कीटकनाशक बदलून करावी. दोन फवारण्यांमध्ये ॲझाडिरेक्टीन (३०० पीपीएम) ५ मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे.