हरभरा
हरभरा पीक ११० ते १२० दिवसांमध्ये तयार होते. हरभरा पीक सध्या काढणीच्या स्थितीत आहे. पीक ओलसर असताना काढणी करू नये. घाटे कडक वाळल्यानंतर हरभऱ्याची काढणी करून मळणी करावी. यानंतर धान्याला ६ ते ७ दिवस कडक ऊन द्यावे. हरभरा कोठीमध्ये साठवून ठेवावा. त्यामध्ये ५ टक्के कडुलिंबाचा पाला घातल्यास साठवणीमध्ये कीड लागत नाही.