गहू पिक साठवणूक सल्ला

 गहू

गहू साठविण्यासाठी ओलावा, उंदीर, पक्षी आणि अस्वच्छतेपासून मुक्‍त अशा सुरक्षित जागेची निवड करावी. गहू साठवण्यासाठी धातूच्या पत्र्यापासून अथवा सिमेंटपासून बनवलेल्या सुधारित कोठीचा वापर करावा. पोती स्वच्छ साफ करूनच त्यात धान्य भरावे. पोती लाकडी फळ्या अथवा पॉलिथीनच्या चादरीवर ठेवावीत. साठवणूकीच्या काळात गव्हामध्ये किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी त्यात ओलाव्याचे प्रमाण दहा टक्क्यांपेक्षा कमी ठेवावे. त्यासाठी मळणीनंतर गव्हास तीन ते चार दिवस चांगले ऊन द्यावे. त्यानंतर गहू थंड होऊ द्यावा. त्यानंतर साठवण करावी. शिफारस केलेल्या रसायनांचा तज्ज्ञांच्या सल्ल्याने बंद कोठीत वापर करावा. पुढील वर्षी बियाणे म्हणून वापरताना गहू बियाण्यास प्रति किलो १० ग्रॅम वेखंड भुकटीची बीजप्रक्रिया करावी.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.



Post a Comment (0)
Previous Post Next Post