टोमॅटो पिकासाठी ठिबक सिंचनाचा वापर

टोमॅटो 


टोमॅटो पिकासाठी ठिबक सिंचनाचा वापर केला असता ४५ टक्‍क्‍यांपर्यंत पाणी बचत व १५ ते २५ टक्के उत्पादनात वाढ मिळते. टोमॅटो पिकासाठी ठिबक सिंचन संच वापरावयाचा असल्यास, पिकाच्या लागवड पद्धतीमध्ये थोडासा बदल करणे आवश्‍यक आहे. सर्वसाधारणपणे सलग लागवड करण्यापेक्षा जोड ओळ पद्धतीचा वापर केला असता आंतरमशागत, तोडणी, फवारणी इत्यादी कामे सुलभतेने करता येतात आणि महत्त्वाचे म्हणजे ठिबक सिंचन संचाच्या खर्चात ३० टक्के बचत होते. हंगामानुसार जमिनीची पूर्वमशागत झाल्यानंतर टोमॅटोसाठी ठिबक सिंचनासाठी शेताचे सर्वेक्षण करून आराखडा तयार करावा. त्यानंतर आराखड्यानुसार ठिबक सिंचन संचाची मांडणी करावी. उच्चतम गुणवत्तेच्या संचाची निवड करावी. संकरित टोमॅटोसारख्या जवळच्या अंतराच्या पिकासाठी इनलाईन ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. इनलाईन उपनळ्या (लॅटरल) १२ मि.मी., १६ मि.मी. व्यासामध्ये उपलब्ध आहेत. टोमॅटोसाठी दोन इनलाईन नळ्यांमधील अंतर १८० ते २२५ सें.मी. ठेवावे. त्यासाठी शक्‍यतो जमिनीच्या प्रकारानुसार ६०-१०० सें.मी. किंवा ७५-१५० सें.मी. जोड ओळ (टोमॅटोच्या दोन ओळींमध्ये ६० सें.मी./ ७५ सें.मी. अंतर व दोन जोड ओळींमध्ये १२०/ १५० सें.मी.चा पट्टा) पद्धतीने लागवड करावी. ड्रीपरचा प्रवाह ४ लिटर प्रति तास व ड्रीपर्समध्ये अंतर जमिनीच्या प्रकारानुसार ३० ते ६० सें.मी. असलेल्या इनलाईन नळीची निवड करावी.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post