केळी |वादळी वारा, अवकाळी पाऊस, गारपीटीने नुकसानग्रस्त केळीबागेचे व्यवस्थापन |

केळी

वादळी वारा, अवकाळी पाऊस, गारपीटीने नुकसानग्रस्त केळीबागेचे व्यवस्थापन

 👉 पुर्णपणे उन्मळून पडलेली झाडे बागेबाहेर काढावीत. वाकलेल्या झाडांना आधार द्यावा.


 👉विक्रीयोग्य घडांची त्वरित कापणी करून विक्री करावी.
 👉घडांतील इजा झालेली केळी काढून त्यांची विल्हेवाट लावावी.
 👉नवीन बागेतील जास्त नुकसान झालेल्या झाडांची एक-दोन नुकसानग्रस्त पाने कापून घ्यावीत.
 👉सहा महिन्यांच्या झाडांची पाने पूर्णपणे फाटली असल्यास, अशी झाडे कापून बागेबाहेर काढून टाकावीत.
 👉घड निसवण होऊन दोन महिने झालेल्या झाडांची पाने पूर्णपणे फाटली असली तरी, अशा घडांना पक्वतेसाठी फक्त पाण्याची गरज असते. म्हणून अशा झाडांचे योग्यरीतीने सिंचन व्यवस्थापन करावे.
 👉जया झाडांची निसवण झालेली नाही, मात्र पाने पूर्ण फाटून गेली आहेत; अशा झाडांना चार किंवा त्यापेक्षा जास्त पाने फुटण्याची वाट पाहावी. त्यासाठी झाडांचे योग्य व्यवस्थापन करावे. हे करूनही पाने न फुटल्यास अशी झाडे काढून टाकावीत.
 👉सपूर्ण बागेतील झाडांची पाने फाटून गेली असल्यास, अशा झाडांचे योग्य पोषण करून नवीन जोमदार फुटव्यांना वाढवून पहिले खोडवा पीक घेता येऊ शकते.
 👉कोवळ्या नुकसानग्रस्त घडांचा वापर पशुखाद्य म्हणून करता येईल.
 👉गारपिटीमुळे झाडांची पाने, खोड व घडांवर जखमा होऊन बुरशीजन्य किंवा जिवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. झाडांवर कॉपर ऑक्झिक्लोराइड २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. 👉 सिगाटोका म्हणजेच करपा रोगाच्या नियंत्रणासाठी, मॅन्कोझेब २.५ ग्रॅम किंवा प्रोपीकोनॅझोल १ मि.लि. प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.



Post a Comment (0)
Previous Post Next Post