टोमॅटो पिकातील विषाणूजन्य रोग नियोजन

 टोमॅटो

टोमॅटो पिकातील विषाणूजन्य रोग 

⭕️ महाराष्ट्रात आढळणारे प्रमुख- ग्राउंडनट बड नेक्रोसिस, टोमॅटो लीफ कर्ल, टोमॅटो मोझॅक, टोमॅटो क्लोरोसिस 

⭕️ अन्य- टोबॅको व्हेन डिस्टॉर्शन, टोबॅको मोझॅक, टोमॅटो बिग बड 

👉 गराउंडनट बड नेक्रॉसिस 

सुरुवात प्रथम शेंड्याकडून होते. शेंड्याकडून नवीन पानांवर प्रथम लहान तांबूस-काळसर ठिपके, चट्टे, तपकिरी वर्तुळे दिसून येतात. रोगाचे प्रमाण वाढून तीन-चार दिवसांत कोवळी पाने करपून काळी पडतात. रोग पाने, देठ, कोवळ्या फांद्या आणि खोडापर्यंत पसरत जाऊन तपकिरी-काळपट चट्टे पडतात. प्रादुर्भाव लागवडीपासून एक महिन्याच्या आत झाल्यास फळधारणा न होता झाड १०-१५ दिवसांत करपून मरून जाते. उशिरा रोग आल्यास फळांचे काही तोडे होतात. प्रादुर्भाव फळांवरही होतो. आकार वेडावाकडा, अनियमित होतो. फळांवर पिवळसर-लाल डाग तसेच गोलाकार एकात एक वलये दिसून येतात. फळे पूर्ण वाढ होण्यापूर्वीच पिकतात. त्यांना एकसारखा आकर्षक रंग येत नाही. प्रसार फुलकिड्यांमार्फत होतो. 

👉 टोमॅटो मोझॅक 

पाने फिक्कट पिवळसर, बुटाच्या लेसप्रमाणे लांबलेली, वाकडी दिसतात. पानांवर हिरवट-पिवळसर डाग, वाढ खुंटते, फळे रंग��ीन, उशिरा पक्व होणारी, लहान आकाराची आढळतात. प्रसार स्पर्शाने व मावा किडीमार्फत होतो. 

👉 लीफकर्ल 

पाने बारीक, वाकडी-तिकडी, सुरकुतल्यासारखी, आतील बाजूस वळलेली दिसतात. पानांचा रंग फिक्कट हिरवा-पिवळसर होतो. झाडाची वाढ खुंटते. झाड खुजे राहून बोकडल्यासारखे दिसते. फळे आकाराने लहान राहतात. रोगाचा प्रादुर्भाव सुरुवातीला झाल्यास फळधारणा होत नाही. प्रसार पांढऱ्या माशीमुळे होतो. 

👉 टोमॅटो क्लोरोसिस 

पानांच्या शिरा हिरवट राहून इतर भाग हिरवट-पिवळसर होतो. मॅग्नेशिअमची कमतरता असल्यासारखी लक्षणे दिसतात. प्रसार पांढऱ्या माशीमार्फत होतो.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post