कांद्यावरील निर्यातक्षम प्रक्रिया पदार्थ

 कांदा-लसूण

🧅 कांद्यावरील निर्यातक्षम प्रक्रिया 

👉 कमीत कमी प्रक्रिया केलेले कांदे 

कांदे सोलून/ कापून त्यांच्यात प्रिझर्वेटिव्हस वापरली जातात. असे सोललेले/ कापलेले कांदे उत्तम पॅकेजिंगद्वारे अधिक काळ ताज्या स्वरूपामध्ये राहू शकतात. सोललेले कांदे ५% उर्ध्वपातित व्हिनेगार द्रावणाचा वापर करून संरक्षित केले जातात. कापलेल्या कांद्यांसाठी पोटॅशियम सल्फेटचा (०.२५%) प्रिझर्वेटिव्ह म्हणून वापर केला जातो. 

👉 कांदा पेस्ट 

कापलेले कांदे तेलामध्ये तळून घेतले जातात. नंतर मिक्‍सरमधून काढून त्यांची पेस्ट केली जाते. पेस्ट केल्यामुळे कांद्याची साठवणक्षमता वाढते. 

👉 डिहायड्रेटेड कांद्यापासून पावडर, फ्लेक्‍स 

कांद्याचे निर्जलीकरण केल्याने सूक्ष्मजीववाढीस प्रतिबंध होऊन कांद्याची साठवणक्षमता वाढते; तसेच त्याचे आकारमान कमी होत असल्याने वाहतुकीस सोपे जाते. निर्जलीकरणामुळे कांद्याची आर्द्रता कमी होते. अशा कांद्यांना योग्यप्रकारे काप देऊन, फ्लेक्‍स किंवा भुकटी तयार करता येते. डिहायड्रेटेड कांद्याचे फ्लेक्‍स आणि पावडर वातावरणातील आर्द्रता शोषून घेणारे असल्याने, त्यासाठी योग्य पॅकेजिंग तंत्रज्ञान वापरणे अत्यावश्‍यक आहे. 

👉 लोणचे 

व्हिनेगर किंवा तेलाचा वापर करून कांद्याचे लोणचे तयार करता येते. अमेरिका आणि युरोप बाजारपेठेमध्ये व्हिनेगर वापरून, तर आशिया-आफ्रिका बाजारपेठेमध्ये तेल वापरून बनवलेले कांद्याचे लोणचे लोकप्रिय आहे. 

👉 तेल 

प्रक्रियाकृत उत्पादनांमध्ये कांद्याचा स्वाद आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या तेलाचा वापर होतो. काही उत्पादनांमध्ये प्रिझर्वेटिव्ह म्हणूनही त्याचा वापर केला जातो. 

👉 सिरका/ वाइन/ सॉस 

कांद्यामध्ये साखर आणि इतर पोषक पदार्थ जास्त असतात. त्यामुळे त्याच्यावर प्रक्रिया करून व्हिनेगर (सिरका), सॉस आणि वाइन आदींची निर्मिती करता येते.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post