भुईमुग
पेरणीनंतर ४५ व ५५ दिवसांनी २०० लिटर पाण्याचा मोकळा पत्र्याचा ड्रम पिकावरून दोनदा फिरवावा. यामुळे सगळ्या आऱ्या जमिनीत घुसतात. त्यांना शेंगा लागतात.
भुईमूग पेरणीवेळी व आऱ्या सुटताना प्रत्येकी ८० किलो जिप्सम हे सल्फर व कॅल्शिअमची उपलब्धता करण्यासाठी जमिनीतून द्यावे. जेणेकरून शेंगा लागण्याचे प्रमाण वाढते आणि एकूणच उत्पादन वाढ होते.