आले
प्रक्रियायुक्त पदार्थ
✨आल्याचे लोणचे
लोणचे तयार करण्यासाठी घटक पुढीलप्रमाणे : आल्याचे तुकडे १००० ग्रॅम, लवंग ३ ग्रॅम, ओवा १० ग्रॅम, मोहरी १० ग्रॅम, काळी मिरी ३० ग्रॅम, हिंग ५ ग्रॅम, जिरे २० ग्रॅम, मेथी ८ ग्रॅम, लाल मिरची पावडर ३० ग्रॅम, सायट्रिक आम्ल १० ग्रॅम, हळद २० ग्रॅम, मीठ २५०-३०० ग्रॅम, व्हिनेगार १०-२० मि.लि., तेल ५०० मि.लि. कोवळे, तंतुविरहित, निरोगी आले निवडून स्वच्छ धुऊन, साल काढून त्याचे चौकोनी छोटे तुकडे करावेत. हे तुकडे काही काळासाठी सावलीमध्ये पसरून ठेवावेत. म्हणजे तुकड्याच्या पृष्ठभागावरील पाणी निघून जाईल. एकूण मसाल्याच्या अर्धा भाग घेऊन त्याची पावडर करावी व अर्धा भाग तसाच ठेऊन द्यावा. गरम करून थंड केलेले अर्धे तेल घेऊन हिंग, मेथी, काळी मिरी, जिरे, लवंग, मोहरीची डाळ टाकून फोडणी द्यावी व मिश्रण चांगले मिसळून घ्यावे. नंतर यामध्ये बारीक पावडर केलेले मसाले टाकून ते मिश्रण पुन्हा चांगले हलवून/ मिसळून घ्यावे. या मसाल्यामध्ये आल्याचे तुकडे टाकून पुन्हा चांगले मिसळून घ्यावे. या मसाल्यामध्ये आल्याचे तुकडे टाकून पुन्हा चांगले मिसळून घ्यावे आणि शेवटी व्हिनेगार, सायट्रिक आम्ल मिसळावे. मिश्रण निर्जंतुक केलेल्या रुंद तोंडाच्या काचेच्या बाटल्यांमध्ये भरून उरलेले तेल ओतावे. सर्व तुकडे तेलाच्या खाली राहतील याची काळजी घ्यावी. हे मिश्रण अधून-मधून पळीने हलवावे. अशा तऱ्हेने दोन-तीन आठवड्यांत आल्याचे लोणचे तयार होते.