हळद
प्रक्रियायुक्त पदार्थ
✨ सुगंधी तेल हळद ही मुळातच औषधी व गुणकारी असल्यामुळे तिच्यापासून सुगंधी तेल काढता येते. हळदीच्या ताज्या गड्ड्यांपासून ५ ते ६ टक्के तेल मिळते. हे तेल नारंगी पिवळ्या रंगाचे व हळदीसारखा सुवास असणारे असते.
✨ ओलीओरिझीन निर्मिती हळदीच्या भुकटीपासून ओलेओरिझीन काढण्याची पद्धत म्हैसूरच्या केंद्रीय अन्नतंत्र संशोधन संस्थेने प्रमाणित केली आहे. रंग व स्वादाकरिता त्याचा उपयोग औषधे व खाद्य पदार्थांमध्ये करतात. म्हणून त्याला चांगली मागणी आहे. याचे शेकडा प्रमाण ५ ते ७ टक्के असून, त्यातील व्होलाटाईल तेलाचे प्रमाण १८ ते २० टक्के आहे.
✨ औषधे तयार करण्यासाठी हळद कडू, तिखट, रूक्ष, लघु, उष्ण, कफवातशामक, पित्तरेचक, वर्ण सुधारणारी, रक्तप्रसादक आहे. उष्णवीर्य म्हणून कफवातशामक, पित्तरेचक व तिक्तरसाने पित्तशामकही आहे. साहजिकच त्रिदोषात्मक विकारावर उपयोगी पडते. हळदीचे असे अनेक औषधी गुणधर्म आहेत.
✨ लोणचे ओल्या आंबे हळदीच्या कंदापासून उत्तम प्रकारचे लोणचे बनविता येते.