सुर्यफुल
फुले उमलण्याच्यावेळी पेरणीपासून ४५ ते ५५ दिवसांनी नॅप्थील ॲसेटीक ॲसीड (एन.ए.ए.) या संजीवकाची २० पी.पी.एम. या प्रमाणात फवारणी करावी. यामुळे दाणे भरण्याचे प्रमाण वाढते, उत्पादनात वाढ होते.
बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या ०.२ टक्के द्रावणाची (२ ग्रॅम प्रति लिटर पाणी) फवारणी पीक फुलोऱ्यात असताना करावी. यामुळे परागकणांची कार्यक्षमता सुधारून परागीभवनास त्याचा फायदा होतो. फुलातील दाणे भरण्याचे प्रमाण वाढते.