आले आठवडी सल्ला | बियाणे नियोजन |

 आले 

बियाणे नियोजन

बियाण्यासाठी ठेवायचे आले पूर्ण तयार झाल्यानंतर, म्हणजेच नऊ महिन्यानंतर जमिनीतून काढावे. काढणी झाल्यानंतर बियाण्यासाठीचे कंद लगेच किंवा शक्‍य तेवढ्या लवकर सावलीत ठेवावेत. बेण्याच्या मुळ्या काढू नये. बेणे बुरशीनाशकांच्या द्रावणामध्ये बुडवू नये. बंद खोलीत, हवा खेळती राहत नाही, अशा ठिकाणी बेणे साठवू नये. ज्या ठिकाणी जमिनीतील पाण्याची पातळी १ मीटरपेक्षा खोल आहे, अशा सावलीच्या ठिकाणी १ मीटर खोल व जरुरीप्रमाणे लांब-रुंद खड्डा खोदावा. खड्याच्या तळाला उतार द्यावा. खड्ड्याच्या तळाशी ३-४ इंच जाडीचा विटांच्या तुकड्यांचा थर द्यावा. त्यावर १ किलो कार्बेंडाझिम पावडर धुरळावी. त्यावर निर्जुंतक केलेला आल्याचा पाला/ पाचट/ गव्हाचे काड/ वाळलेले गवत (क्विनॉलफॉस २ मि.लि. अधिक कार्बेंडाझिम १ ग्रॅम प्रतिलिटर पाणी प्रमाणे फवारून उन्हात वाळवून घ्यावे) ६-८ इंच जाडीचा थर द्यावा. खड्ड्यच्या बाजूलाही तेवढ्याच जाडीचा पाल्याचा थर द्यावा. १ फूट उंचीचा थर झाला, की पुन्हा थरावर १ किलो कार्बेंडाझिम पावडर धुरळावी. खड्डा ३ फूट उंचीपर्यंत भरुन घ्यावा. त्यानंतर त्यावर निर्जंतुक केलेल्या पाल्याचा थर टाकावा. तसेच खड्ड्यामध्ये १ मीटर अंतरावर छिद्र पाडलेले पोकळ बांबू किंवा २.५-३ इंच व्यासाचे छिद्र पाडलेले पीव्हीसी पाइप टाकावेत. त्यानंतर खड्डा लाकडी फळी किंवा गोणपाटाने झाकून घ्यावा. पाऊस आल्यास तेवढ्यापुरता खड्डा प्लॅस्टिक कागदाने झाकून घ्यावा. २.५-३ महिन्यांत आल्याच्या कंदाचे डोळे फुगून बारीक कोंब येतात. असे कोंब असलेले आले बियाण्यासाठी वापरावे. बियाण्याच्या वजनामध्ये २५-३०% घट येते.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.




Post a Comment (0)
Previous Post Next Post