बाजरी
रोग नियंत्रण
⭕️ अरगट
२० टक्के मिठाच्या द्रावणाची बीजप्रक्रिया करावी. कणसे बाहेर पडण्यापूर्वी थायरम (०.१ ते ०.१५ टक्के) किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड + थायरम (२:१) २०० ते २५० ग्रॅम या प्रमाणात दोन ते तीनवेळा फवारणी करावी. उशिरा पेरणी करू नये. रोगट झाडे उपटून नष्ट करावीत. खोल नांगरट व पिकाची फेरपालट करावी.
⭕️ केवडा किंवा गोसावी
पीक २० ते २१ दिवसांचे झाल्यावर रोगट झाडे उपटून टाकावीत. पेरणीनंतर १४ दिवसांनी पिकावर कॉपर ऑक्सिक्लोराईड एकरी ४०० ग्रॅम २०० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. यानंतर ८ ते १० दिवसांनी दुसरी फवारणी करावी किंवा मेटॅलॅक्झील एम.झेड. ७२ ४ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून पेरणीनंतर २० दिवसांनी फवारावे. गोसावी किंवा केवडा रोगग्रस्त शेतात पुन्हा बाजरी घेऊ नये. रोगास बळी न पडणारे वाण वापरावेत.