सुर्यफुल रोग नियंत्रण | पानावरील अल्टरनेरिया ठिपके किंवा करपा,भुरी |

 सुर्यफुल

रोग नियंत्रण 

⭕️ पानावरील अल्टरनेरिया ठिपके किंवा करपा 

कॅप्टन/ थायरम ३ ग्रॅम किंवा कार्बेंडाझीम २ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. नत्राबरोबरच शिफारशीत स्फुरद व पालाशयुक्त खतांची मात्रा दिल्यास पिकाची रोग प्रतिकारशक्ती वाढते. पेरणीनंतर मँकोझेब २ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून गरजेनुसार ठराविक दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. 

⭕️ भुरी 

गंधक भुकटी (३०० मेश) ८ किलो प्रतिएकर याप्रमाणात पिकावर सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळी धुरळावी किंवा विद्राव्य गंधक २.५ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 

⭕️ केवडा (डाऊनी मिल्डयू) 

मेटॅलॅक्झील ६ ग्रॅम प्रतिकिलो बियाण्यास बीजप्रक्रिया करावी. उभ्या पिकामध्ये मेटॅलॅक्झील + मँकोझेब (संयुक्त बुरशीनाशक) ४ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. रोगग्रस्त भागामध्ये वारंवार सूर्यफुलाचे पीक घेणे टाळावे. स्वच्छ आंतरमशागत करावी. रोगग्रस्त पाने, झाडाचे भाग गोळा करून नष्ट करावेत. 

⭕️ शेडेमर (बड नेक्रॉसिस) 

हा रोग टोबॅको स्ट्रिक व्हायरस विषाणूमुळे होतो. प्रसार फुलकिड्यामार्फत, रोगबाधित सूर्यफुलाच्या परागगणाद्वारे होतो. दुधी, जखमजोड, गोखरू, गाजरगवताच्या रोगग्रस्त परागकणाद्वारेही रोग पसरतो. 

बांधावरील तण नष्ट करावे. रोगग्रस्त रोपे उपटून जाळून नष्ट करावीत. पिकाभोवती बाजरी किंवा ज्वारीच्या तीन ते पाच सीमा ओळी लावाव्यात. इमीडाक्‍लोप्रीड (७५ डब्ल्यूएल) ५ ग्रॅम प्रतिकिलो बियाण्यास बीजप्रक्रिया करावी. पेरणीनंतर १५, ३० व ४५ दिवसांनी प्रादुर्भाव दिसताच इमीडाक्‍लोप्रीड ०.३ मि.लि. किंवा थायमेथोक्‍झाम ०.५ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. यामुळे फुलकिडीचे नियंत्रण होऊन नेक्रॉसिस रोग आटोक्‍यात येतो.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.



Post a Comment (0)
Previous Post Next Post