आंबा काढणी सल्ला

 आंबा 


काढणीस तयार असलेल्या चौदा आणे (८० ते ८५ टक्के) पक्वतेला देठासह आंबा फळांची काढणी झेल्याच्या साह्याने सकाळी १० वाजेपर्यंत किंवा संध्याकाळी ४ नंतर करावी. उष्णतेमुळे फळांचे तापमान वाढून साक्याचे प्रमाण वाढू शकते. आंब्याची फळे काढल्यानंतर सावलीमध्ये ठेवावीत. फळकूज या काढणीपश्‍चात बुरशीजन्य रोगापासून फळांचे संरक्षण करण्यासाठी काढणीनंतर लगेच फळे पोटॅशिअम मेटाबायसल्फाइट ०.०५ टक्का (०.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी) प्रमाणे ५० अंश सेल्सिअस तापमानाच्या द्रावणात १० मिनिटे बुडवून काढावीत. नंतर ही फळे पिकविण्यासाठी ठेवावीत. कोरूगेटेड फायबर बॉक्समध्ये फळांचे पॅकिंग करावे. आंबा फळांची वाहतूक रात्रीच्या वेळेस करावी. फळे काढणीच्या किमान ८ दिवस आधी झाडावर कोणतीही फवारणी करू नये.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post