खोडवा ऊस
ऊसाचा खोडवा काढून टाकायचा असल्यास पाचट व्यवस्थापन असे करावे
✔️ खोडवा ऊस काढून टाकावयाचा असल्यास, शेतातील पाचट पेटवू नये किंवा शेताबाहेर काढू नये.
✔️ खोडवा ऊस तोडणीनंतर पाचट शेतात एकसारखे पसरून चांगले वाळू द्यावे, म्हणजे पाचट व्यवस्थापन करणे सोपे जाते.
✔️ पाचट कुट्टी मशिनच्या सहाय्याने पाचटाचे बारीक तुकडे करून घ्यावेत.
✔️ पाचट कुजविण्यासाठी पाचटावर एकरी १ पोते युरिया व १ पोते सिंगल सुपर फॉस्फेट आणि त्यानंतर एकरी ४ किलो पाचट कुजविणारे जिवाणू संवर्धन टाकावे.
✔️ ऊसाच्या बुडख्यांचे व मुळ्यांचे लहान तुकडे करण्यासाठी व काढण्यासाठी रोटाव्हेटरचा वापर करावा.
✔️ साखर कारखान्यातील मळी किंवा मळीचे कंपोस्ट एकरी २.५ टनापर्यंत पाचटावर टाकल्यास पाचट लवकर कुजण्यास मदत होते.
✔️ पलटीच्या सहाय्याने पाचट जमिनीत गाडावे (माती आड करावे) आणि आवश्यकता असल्यास शेताला पाणी द्यावे.
अशा प्रकारे पाचट दोन ते तीन महिन्यांत चांगल्याप्रकारे कुजवून जमिनीची सुपिकता वाढविता येते.