आंबा
पाण्याच्या उपलब्धतेनुसार आठवड्यातून एकदा १०० लिटर पाणी प्रति झाड किंवा १५ दिवसांतून एकदा १५० ते २०० लिटर पाणी प्रति झाड या प्रमाणात फळे वाटाणा आकारापासून ते सुपारी आकाराची होईपर्यंत द्यावे. मात्र फळे काढणीस तयार होण्याच्या एक महिना अगोदर झाडास पाणी देणे बंद करावे. झाडाच्या बुंध्याभोवती आळ्यामध्ये गवताचे आच्छादन करावे. आंबा कलमांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी झाडाच्या बुंध्याला बोर्डो पेस्ट लावावी. नवीन लागवड केलेल्या आंबा कलमांना पहिली तीन वर्षे पाणी देण्याची व्यवस्था करावी. यामध्ये पहिल्या वर्षी आठवड्यातून दोनवेळा तर दुसऱ्या वर्षी पंधरा दिवसांतून दोनवेळा आणि तिसऱ्या वर्षी महिन्यातून दोनवेळा प्रत्येक कलमास ३० लिटर पाणी द्यावे. झाडाच्या आळ्यामध्ये गवताचे आच्छादन करावे. नवीन लागवड केलेल्या रोपांना सावली करावी.