शेळी पालन:-
शेळ्यांना पिण्याचे पाणी २४ तास उपलब्ध करून द्यावे. पाणी स्वच्छ, थंड व पिण्यायोग्य असावे. शेळ्यांना रात्रीपेक्षा दिवसा चारपट अधिक पाणी लागते; त्यामुळे स्वच्छ भांड्यात किंवा हौदात पाणी उपलब्ध करून द्यावे. कडक उन्हात शेळ्यांच्या मानेवर, पाठीवर व पायावर पाणी शिंपडावे. पाण्याचे हौद किंवा बकेट असतील, तर त्यांची जागा व संख्या वाढवावी. पाण्याचे हौद स्वच्छ व धुतलेले असावेत. पाण्याचा हौद पंधरा दिवसांतून एकदा संपूर्ण कोरडा करून त्याला आतून चुना लावावा. गढूळ पाणी स्वच्छ करण्यासाठी पाण्यात तुरटी फिरवण्यासारखा सोपा उपाय करता येऊ शकेल. तसेच बाजारात पाणी स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायझर टॅबलेटही उपलब्ध आहेत.