संत्रा-मोसंबी-लिंबू
⭕️रोग नियंत्रण
◐ फांद्या कापणीनंतर कात्री सोडियम हायपोक्लोराईटच्या १ ते २ टक्के द्रावणात बुडवून निर्जंतुकीकरण करावे. झाडांच्या बुंध्यावर ब्रशने २ फूट उंचीपर्यंत १० टक्के बोर्डो पेस्ट लावावी. बोर्डो पेस्ट तयार करण्याकरिता १ किलो मोरचूद व १ किलो चुना ५ लिटर पाण्यात रात्रभर वेगवेगळे भिजत ठेवावेत. दुसऱ्या दिवशी सकाळी एकत्र करून ही पेस्ट १२ तासांच्या आत वापरावी.
◐ फायटोफ्थोरा - मेटॅलॅक्झील एम (४%) + मॅंकोझेब (६४%) (संयुक्त बुरशीनाशक) किंवा फोसेटील एएल (८० डब्ल्यूपी) २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे संपूर्ण झाड ओले होईपर्यंत फवारणी करावी. हे द्रावण झाडाभोवती अळ्यातही टाकावे.
⭕️कीड नियंत्रण
◐ सिट्रस सायला - इमिडाक्लोप्रिड (१७.८ एसएल) ०.५ मि.लि. किंवा ॲसिफेट (७५ एसपी) १ ग्रॅम किंवा डायमिथोएट (३० ईसी) १.५ मि.लि. प्रति लिटर पाणी प्रमाणे फवारणी करावी. गरजेनुसार दुसरी फवारणी दहा दिवसांच्या अंतराने कीटकनाशक बदलून करावी.
◐ पाने पोखरणारी अळी (लीफ मायनर) - स्पिनोसॅड (४५ एससी) ०.३४ मि.लि. किंवा डायमिथोएट (३० ईसी) १.५ मि.लि. किंवा नोव्हॅल्युरॉन (१० ईसी) ०.८७ मि.लि. प्रति लिटर पाणी प्रमाणे फवारणी करावी.