सुरु उसातील आंतरपिके

 सुरु ऊस

आंतरपिके 

सुरू उसाची लागवड डिसेंबर महिन्यात केल्यास फ्लॉवर, कोबी, नवलकोल, गवार तसेच मुळा ही भाजीपाला पिके घेता येतात. कोथिंबीर अथवा मेथीसुद्धा घेण्यास हरकत नाही. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात उसाची लागण करावयाची असल्यास भुईमुगाची एस.बी.-११, टॅग-२४ किंवा टी.जी.-२६ या जातींचा वापर करावा. या महिन्यात भेंडी, कांदा, चाऱ्यासाठी चवळी, सोयाबीन, कलिंगड व खरबूज ही पिके घेता येतात. लागण पट्टा पद्धतीने (२.५-५ किंवा ३-६ फूट) असल्यास आंतरपीक चांगल्या प्रकारे घेता येते. आंतरपिकासाठी व्यापलेल्या क्षेत्रानुसार त्या पिकाची शिफारशीत खत मात्रा वेगळी द्यावी. जमिनीच्या सुपिकतेसाठी ताग, धैंचा यासारख्या हिरवळीच्या पिकांचा आंतरपीक म्हणून समावेश करता येतो. बाळ बांधणीच्या वेळी ही पिके सरीमध्ये गाडून बाळ बांधणी करता येते.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post