पूर्वहंगामी ऊस आंतरमशागत व तणनियंत्रण

 पूर्वहंगामी ऊस

आंतरमशागत व तणनियंत्रण 

👉लागवडीनंतर ३ ते ४ दिवसांनी जमीन वाफश्यावर असताना, एकरी २ किलो ॲट्राझीन (५० डब्ल्यूपी) किंवा ६०० ग्रॅम मेट्रीब्युझिन (७५ डब्ल्यूपी) प्रति ४०० लिटर पाण्यात मिसळून जमिनीवर फवारणी करावी. फवारणीनंतर चार दिवसांपर्यंत कोणत्याही प्रकारची मशागत करू नये. 

👉ऊस उगवणीनंतर हरळी किंवा लव्हाळा या तणांचा प्रादुर्भाव आढळल्यास, १० लिटर पाण्यात ८० मि.लि. ग्लायफोसेट (४१ एसएल) या तणनाशकाची जमिनीलगत तणांवर फवारणी करावी. उसावर तणनाशक पडू नये, यासाठी प्लॅस्टिक हुडचा वापर करावा. तसेच डब्ल्यूएफएन ६२ या तणनाशक नोझलचा वापर करावा. 

👉उगवणीनंतर ६० ते ७० दिवसांनी २, ४-डी (क्षार स्वरुपातील) ५०० ग्रॅम प्रति २०० लिटर पाण्यात मिसळून तणांवर फवारणी करावी. 

👉तसेच आवश्यकतेनुसार कृषीराजसारख्या औजाराने किंवा खुरपणीद्वारे तणनियंत्रण करावे. 

👉लागवडीनंतर २ ते ३ महिन्यांनी बाळ बांधणी करावी. 

👉ऊस पीक ४ ते ४.५ महिन्यांचे झाल्यानंतर पहारीच्या औजाराने वरंबे फोडून व नंतर सायन कुळव चालवून आंतरमशागत करावी. रासायनिक खतांची शेवटची मात्रा देऊन रिजरच्या सहाय्याने मोठी बांधणी करावी. पाणी देण्यासाठी सर्‍या, वरंबे सावरुन घ्यावेत.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post