सुर्यफुल पिकाची बीजप्रक्रिया

 सुर्यफुल


उन्हाळी सूर्यफुल लागवडीसाठी ईसी ६८४१४, एसएस ५६, भानू, फुले भास्कर हे सुधारित वाण किंवा केबीएसएच १, केबीएसएच ४४, फुले रविराज या संकरीत वाणांची निवड करावी. सूर्यफुलाच्या पेरणीसाठी सुधारित वाणांचे ३.२ ते ४ किलो बियाणे, तर संकरीत वाणांचे २ ते २.४ किलो बियाणे प्रति एकरी वापरावे. मर रोग, मूळकुज, चारकोल रॉट रोगाच्या नियंत्रणासाठी प्रति किलो बियाण्यास २.५ ग्रॅम कॅप्टन किंवा थायरम किंवा कार्बेंडाझिमची प्रक्रिया करावी. केवडा रोग नियंत्रणासाठी ६ ग्रॅम मेटॅलॅक्झील (३५ एसडी) प्रति किलो बियाण्यास प्रक्रिया करावी. विषाणूजन्य शेंडेमर (बड नेक्रॉसिस) रोगाचा प्रसार करणाऱ्या व रस शोषण करणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी, इमिडाक्‍लोप्रीड (७० टडब्ल्यूएस) ५ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास बीजप्रक्रिया करावी. रोपांना अन्नद्रव्यांचा पुरवठा लवकर उपलब्ध होण्यासाठी ॲझोटोबॅक्टर व स्फुरद विरघळविणारे जीवाणू प्रत्येकी २५ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास बीजप्रक्रिया करावी. बीजप्रक्रिया करताना प्रथमतः बुरशीनाशक, कीटकनाशकाची प्रक्रिया करून त्यानंतर जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. सरी-वरंबा पद्धतीने भारी जमिनीमध्ये ६० x ३० सें.मी., तर मध्यम जमिनीमध्ये ४५ x ३० सें.मी. अंतरावर टोकण पद्धतीने लागवड करावी.

अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post