हळद
पाणी व्यवस्थापन
💧पावसाच्या स्थितीमध्ये पाणी जमिनीमध्ये साठून राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. पाणी साठून राहिल्यास मुळांना हवा (ऑक्सिजन) घेण्यास अडथळा उद्भवतो. परिणामी पाने पिवळी पडून निस्तेज होऊन मलूल पडतात. साचलेल्या पाण्याचा तात्काळ निचरा होईल, असे नियोजन करावे.
💧रुंद वरंबा पद्धतीने लागवड असल्यास ठिबक सिंचनाचा उपयोग करावा. जमिनीतील ओलाव्यानुसार ठिबक संच चालू ठेवावा. सतत पाणी सोडू नये. सतत ओलावा राहिल्यास हळकुंडे कुजतात. त्यामुळे कंदकुज रोगाचा प्रादुर्भाव होत असतो.
💧पावसाळ्यानंतर हिवाळ्यामध्ये पाण्याच्या दोन पाळ्यातील अंतर १२ ते १५ दिवस ठेवावे. कंद पोसण्याच्या कालावधीमध्ये हळदीला पाण्याची गरज मर्यादित असते. त्यामुळे सात महिने पूर्ण झाल्यानंतर हळदीस पाणी देण्याचा कालावधी हळूहळू कमी करत जावे. आठ महिने पूर्ण झाल्यानंतर जमिनीच्या प्रकारानुसार पाणी बंद करावे. त्यामुळे पानामधील अन्न कंदामध्ये उतरण्यास मदत होते व हळदीस उतारा चांगला मिळतो.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.