हरभरा
रोग व्यवस्थापन
⭕️ मर, मूळकुजव्या, मानकुजव्या
👉मर रोग प्रतिकारक जातींची निवड करावी. (उदा. विजय, दिग्विजय, विशाल, विराट, जॅकी-९२१८, आयसीसीव्ही-१०)
👉परणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा पावडरची किंवा २ ग्रॅम थायरम अधिक २ ग्रॅम कार्बेंडाझीमची बीजप्रक्रिया करावी.
👉टरायकोडर्मा हे जैविक बुरशीनाशक १ किलो प्रति एकर प्रमाणे शेणखत किंवा गांडूळखतासोबत जमिनीत मिसळून द्यावे.
👉हरभरा पिकास वरचेवर पाणी देऊ नये. पिकात पाणी साचून राहणार नाही, याची काळजी घ्यावी.
👉शतामध्ये रोगग्रस्त झाडे दिसून येताच उपटून नष्ट करावीत.
👉परादुर्भावग्रस्त भागामध्ये, कार्बेंडाझिम १ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
👉परादुर्भाव असलेल्या शेतात तीन वर्षापर्यंत हरभऱ्याची लागवड करू नये.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.