आले
पाणी व्यवस्थापन
💧 पावसाच्या स्थितीमध्ये पाणी जमिनीमध्ये साठून राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. पाणी साठून राहिल्यास मुळांना हवा (ऑक्सिजन) घेण्यास अडथळा उद्भवतो. परिणामी पाने पिवळी पडून निस्तेज होऊन मलूल पडतात. साचलेल्या पाण्याचा तात्काळ निचरा होईल, असे नियोजन करावे.
💧 रुंद वरंबा पद्धतीने लागवड असल्यास ठिबक सिंचनाचा उपयोग करावा. जमिनीतील ओलाव्यानुसार ठिबक संच चालू ठेवावा. सतत पाणी सोडू नये. जमिनीत सतत ओलावा राहिल्याने गड्डे कुजतात. त्यामुळे कंदकूज रोगाचा प्रादुर्भाव होतो.
💧 हिवाळ्यामध्ये पाण्याच्या दोन पाळ्यांमधील अंतर १२ ते १५ दिवस ठेवावे. गड्डे पोसण्याच्या कालावधीमध्ये पाण्याची गरज मर्यादित होत जाते. आले पिकास पाणी कमी करत जाऊन आठ महिने पूर्ण झाल्यानंतर पाणी पूर्णपणे बंद करावे. पाणी एकदम बंद केल्यास आल्याला परत अंकुर फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे वजनात घट येते.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.