संत्रा-मोसंबी-लिंबू
🍊आंबीया बहर व्यवस्थापन
👉 आंबीया बहराच्या फळ तोडणीनंतर वाळलेल्या फांद्या किंवा सुकलेली साल काढावी. त्यानंतर त्वरित काबेन्डाझीम १ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
👉 जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात आंबीया बहर घेण्याकरिता झाडाला ताबडतोब ताण द्यावा. पाणी देऊ नये. अधिक चांगल्याप्रकारे ताण देण्यासाठी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये क्लोरमेक्वॉट क्लोराईड (५० एसएल) २ मि.लि. प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
संत्रा-मोसंबी-लिंबू फळगळ व्यवस्थापन
👉 झाडाखालील तण काढून बाग स्वच्छ करावी.
👉 बुंध्याजवळ मातीचे ढीग असल्यास त्यांना तोडून मोकळे करून घ्यावे.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.