आंबा
आंब्याला मोहोर येण्यासाठी झाडाच्या मुळांना ताण बसणे आवश्यक असते. यासाठी बागेतील गवत काढून बागेची साफसफाई लवकरात लवकर पूर्ण करावी. जमिनीमध्ये पाण्याचे प्रमाण बाष्पीभवनामुळे लवकर कमी होऊन झाडांना ताण बसण्यास मदत होईल.
मागील काही दिवसांत झालेल्या पावसामुळे बागेमध्ये मोहोर प्रक्रियेसाठी मुळांना बसणारा ताण हा निघून गेल्याने पावसाची उघडीप मिळाल्यानंतर सपाट भागावर असणार्या आंबा बागेमध्ये शक्य असल्यास नांगरणी करावी. तसेच झाडांच्या बुंध्याजवळील व विस्ताराखालील माती १० ते १२ सें.मी. खोल उकरून मोकळी करावी. जेणेकरून पाण्याचा अंश लवकर कमी होऊन आंब्याच्या झाडांना पुन्हा ताण बसण्यास मदत होईल.