शेळी पालन :-
वातावरणात अचानकपणे होणारे बदल आणि कमी तापमानामुळे शेळ्या व करडांना न्यूमोनिया होण्याची शक्यता असते. ताप येतो, यामध्ये शरीराचे तापमान १०४-१०६ अंश फॅरनहाइटपर्यंत आढळते. शेळ्यांमध्ये ढासणे, खोकताना छातीत दुखणे, श्वसनास त्रास होणे, तोंड पसरून श्वास घेणे, नाकातून स्राव येणे, भूक मंदावणे, मलूल बनून बसणे ही लक्षणे दिसून येतात.
🛡️प्रतिबंधात्मक उपाययोजना
👉शेळ्यांचा गोठा नियमित स्वच्छ व कोरडा ठेवावा.
👉हिवाळ्यात नवजात करडांना उबदार ठिकाणी ठेवावे. जाळीला रात्री पडदे लावून अतिथंडीपासून शेळ्यांचे व करडांचे संरक्षण करावे. दिवसभर पडदे उघडे ठेवावेत.
👉करडांना पुरेसा चीक व दूध पिण्यास द्यावे. बाटलीने दूध पाजताना ठसका न लागता, घाईघाईने न पाजता हळूहळू घोट घेईल तसे दूध पाजावे. प्रत्येकवेळी बाटली गरम पाण्याने स्वच्छ धुऊन ठेवावी.
गोठ्यामध्ये हवा खेळती राहण्यासाठी भिंत कमी उंचीच्या, वर जाळी बसवलेली असावी.
👉शेळ्यांना व करडांना त्यांच्या शारीरिक अवस्थेनुसार आहार द्यावा. शेळ्यांना संतुलित आहार, पशुखाद्य द्यावे, जेणेकरून ���्यांची रोगप्रतिकारक्षमता उत्तम राहील.
👉व्यवस्थापनामध्ये अचानक बदल करू नयेत.
👉शेडमध्ये वयानुसार, शारीरिक अवस्थेनुसार शेळ्या, करडे वेगळी ठेवण्याची व्यवस्था करावी. शेडमध्ये योग्य प्रमाणात जागा ठेऊन गर्दी टाळावी. आजारी शेळ्यांना निरोगी शेळ्यांपासून वेगळे ठेवावे.
👉शेळ्यांना, करडांना एका ठिकाणी बांधून न ठेवता ती फिरती राहतील, अशी व्यवस्था करावी.
👉शेड भोवतालची धूळ वाऱ्यासोबत आत येणार नाही, तसेच शेडमध्येही धूळ जास्त प्रमाणात होणार नाही याची काळजी घ्यावी.
👉लेंडी तपासणी करून जंतनिर्मूलन करावे.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.