संत्रा-मोसंबी-लिंबू
फळगळ व्यवस्थापन
👉 फळबागेत खाली पडलेली फळे वेचून नष्ट करावीत.
👉 झाडावरील वाळलेल्या फांद्यांच्या टोकाची छाटणी करावी. त्यानंतर प्रादुर्भावग्रस्त झाडांवर कार्बेन्डाझीम (५० डब्ल्यूपी) १ ग्रॅम अधिक २,४-डी दीड ग्रॅम किंवा जी.ए.३ दीड ग्रॅम अधिक पोटॅशिअम नायट्रेट १.५ किलो प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. दुसरी फवारणी १५ दिवसांच्या अंतराने करावी.
👉 बाग सुदृढ व रोगविरहित ठेवण्याकरिता मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्ये शिफारशीप्रमाणे द्यावी.
👉 झिंक सल्फेट आणि फेरस सल्फेट प्रत्येकी २०० ग्रॅम प्रमाणात झाडांच्या आळ्यामध्ये टाकून मातीत चांगल्या प्रकारे मिसळावे.
👉 हलक्या जमिनीत लागवड केलेल्या बागेत हलके पाणी द्यावे.
👉 भारी चोपण माती असणाऱ्या बागांमध्ये पाण्याचा निचरा करण्याकडे लक्ष द्यावे.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.