आंबा बागेतील किडी व्यवस्थापन

 आंबा

आंबा बागेतील किडी   

► तुडतुडे - पिल्ले व प्रौढ आंब्याच्या मोहोरावरील, कोवळ्या पालवीमधून तसेच कोवळ्या फळांमधून रस शोषून घेतात. परिणामी मोहोर व लहान फळांची गळ होते. पिल्ले तसेच प्रौढ तुडतुडे शरीरावाटे मधासारखा चिकट पदार्थ बाहेर टाकतात. त्यावर काळ्या रंगाच्या (कॅप्नोडीअम) बुरशीची वाढ होते व झाड काळे पडते यालाच ‘खार पडणे’ असे म्हणतात. 

► फुलकिडे - ही कीड १ मि.मी. आकाराची असून पिल्लांचा रंग पिवळसर असतो. मादी कोवळ्या पानांच्या शिरांमध्ये अंडी घालते. पिल्ले व पूर्ण अवस्थेतील फुलकिडे पानाची साल खरवडून रस शोषतात. पानांच्या कडा तसेच शेंडे करपतात. पाने वेडीवाकडी होतात. प्रादुर्भाव जास्त झाल्यास पानगळ होते, शेंडेच शिल्लक राहतात. कोवळ्या फळांची साल खरवडल्यामुळे फळांची साल काळपट तांबूस किंवा विटकरी रंगाची होते. 

► मिज माशी - प्रादुर्भाव कोवळ्या पालवीवर, मोहोरावर तसेच लहान फळांवर आढळतो. मादी सालीच्या आत अंडी घालते. अळ्या बाहेर पडल्यानंतर पेशींवर उपजीविका करतात. परिणामी त्या ठिकाणी बारीक, फुगीर गाठ तयार होते. पूर्ण वाढलेली अळी गाठीला छिद्र पाडून जमिनीमध्ये कोषावस्थेत जाते. शेंडे जळतात. त्यामुळे मोहोर देखील गळतो किंवा वाळतो. मोहोराची दांडी वेडीवाकडी होते. प्रादुर्भाव लहान फळांवर झाल्यावर वाटाण्याच्या आकाराच्या फळांची गळ होते.

कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.




Post a Comment (0)
Previous Post Next Post