संत्रा व मोसंबी पिकातील ठिबक सिंचन द्वारे पाणी व्यवस्थापन

संत्रा-मोसंबी-लिंबू

ठिबक सिंचन संच असल्यास त्याच्या नळ्या पसरून घ्याव्यात. या दिवसांमध्ये संत्रा व मोसंबीच्या एक वर्षाच्या झाडाला प्रति दिन ८ लिटर, चार वर्षांच्या झाडाला ३६ लिटर, आठ वर्षांच्या झाडाला ८५ लिटर आणि दहा वर्षे व त्यापेक्षा अधिक वयाच्या झाडाला १०५ लिटर पाणी द्यावे. संत्रा, मोसंबीच्या तुलनेमध्ये लिंबूच्या झाडांची पाण्याची गरज कमी असते. एक वर्षाच्या झाडाला प्रति दिन ४ लिटर, चार वर्षांच्या झाडाला १५ लिटर, आठ वर्षांच्या झाडाला ५३ लिटर पाणी आणि दहा वर्षे व त्यावरील झाडाला ८८ लिटर पाणी द्यावे. ठिबक सिंचनाची सुविधा नसल्यास दुहेरी रींग पद्धतीने सिंचनासाठी आळे करावे. पाटपाणी बागेमध्ये देऊ नये.

कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post