हळद पिक आठवडी सल्ला

 हळद


हळदीची साधारणतः चार ते पाच फूट उंची आणि एक फूट घेर या आकारमानामध्ये १२ ते १५ पाने आणि ४ ते ५ फुटवे असल्यास हळदीची वाढ समाधानकारक असल्याचे समजावे. सध्या हळदवाढीच्या दोन अवस्था पूर्ण होऊन हळद तिसऱ्या अवस्थेमध्ये आहे. त्यातील पहिली उगवणीची अवस्था लागवडीपासून दीड महिन्यापर्यंत पूर्ण होते, तर दुसरी शाकीय वाढीची अवस्था ही दीड महिन्यापासून पाच महिन्यांपर्यंत असते. या अवस्थेमध्ये हळदीची उंची, फुटव्यांची संख्या आणि पानांची संख्या निश्‍चित होते. हळदीच्या दुसऱ्या अवस्थेनंतर म्हणजेच लागवडीपासून ५ ते ५.५ महिन्यांनंतर हळदीची उंची वाढत नाही. या टप्प्यात नत्रयुक्त खतांचा वापर कमी करावा. साडेपाच फुटांपेक्षा हळदीची उंची अधिक असल्यास, तज्ञांच्या सल्ल्याने वाढनियंत्रक रसायनांचा वापर करावा. त्यामुळे हळद काडावरती जाण्याचा धोका टळतो. तिसरी अवस्था पाच ते सात महिने या दरम्यान असते. या अवस्थेमध्ये ०-०-५० या पालाशयुक्त विद्राव्य खताचा वापर करावा.

कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post