हरभरा
एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन
✨शेणखत: २ टन/ एकर
✨बीजप्रक्रिया: रायझोबिअम २५ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे
✨ रासायनिक खते: हरभरा पिकास एकरी नत्र १० किलो, स्फुरद २० किलो व पालाश १२ किलो द्यावे. शिफारशीत खतमात्रा पेरणीच्या वेळी एकादाच दोन चाड्याच्या पाभरीने पेरून द्यावी.
😊 जमिनीच्या प्रकारानुसार रासायनिक खतांचा वापर (प्रतिएकर)
👉 काळी जमीन किंवा तांबड्या रंगाच्या जमिनी
युरिया- २२ किलो
सिंगल सुपर फॉस्फेट- १२५ किलो
एमओपी- २० किलो
👉 भुरकट चुनखडीयुक्त जमिनी
१८:४६:००- ४४ किलो
एमओपी- २७ किलो
👉 सर्वसाधारण जमिनी
२४:२४:०- ८३ किलो
एमओपी- २७ किलो
किंवा १५:१५:१५- ८० किलो
किंवा १९:१९:१९- ६३ किलो
किंवा १०:२६:२६- ७६ किलो
किंवा २०:२०:००- १०० किलो
एमओपी- २० किलो
✨सक्ष्म अन्नद्रव्ये: जमिनीत जस्त कमतरता असल्यास (०.६ पी.पी.एम.पेक्षा कमी) ८ किलो झिंक सल्फेट आणि लोहाची कमतरता असल्यास १० किलो फेरस सल्फेट पेरणीच्या वेळी बेसल डोसबरोबर द्यावे.
*हरभऱ्यावर फुले सुरू होताच, मायक्रो न्यूट्रिएन्ट ग्रेड-२ १० मि.लि. प्रतिलिटर पाणी याप्रमाणे आठ दिवसांच्या अंतराने दोनवेळा फवारणी करावी.
हरभऱ्याला दाणे भरण्याच्या अवस्थेत पाणी कमी पडल्यास, पिकावर १३:००:४५ १० ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.