आंबा
🥭 मोहोर संरक्षण वेळापत्रक
1️⃣ फवारणी- पोपटी रंगाच्या पालवीवर मोहोर येण्यापूर्वी, डेल्टामेथ्रीन (२.८ ईसी) ०.९ मि.लि. प्रतिलिटर पाणी प्रमाणे फवारणी करावी. या फवारणीमुळे पावसाळ्यानंतर कोवळ्या फुटीवर येणाऱ्या तुडतुड्यांपासून संरक्षण होते.
2️⃣ फवारणी- बोंगे फुटताना, लॅमडा सायहॅलोथ्रीन (५ ईसी) ०.६ मि.लि. प्रतिलिटर पाणी प्रमाणे फवारणी करावी.
या फवारणीमध्ये भुरी नि��ंत्रणासाठी, हेक्झाकोनॅझोल (५ ईसी) ०.५ मि.लि. किंवा सल्फर (८० डब्ल्यूजी) २ ग्रॅम; तसेच ढगाळ, पावसाळी वातावरण असल्यास, करपा नियंत्रणासाठी कार्बेन्डाझीम + मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) १ ग्रॅम प्रतिलिटर पाणी प्रमाणे मिसळून फवारावे.
3️⃣ फवारणी- दुसऱ्या फवारणीनंतर १५ दिवसांनी, इमिडाक्लोप्रीड (१७.८ एसएल) ०.३ मि.लि. प्रतिलिटर पाणी प्रमाणे फवारणी करावी.
तिसऱ्या, चौथ्या व पाचव्या फवारणीवेळी कीटकनाशक द्रावणामध्ये भुरी नियंत्रणासाठी, हेक्झाकोनॅझोल (५ ईसी) ०.५ मि.लि. प्रतिलिटर पाणी प्रमाणे मिसळून वापरावे. हेक्झाकोनॅझोल उपलब्ध नसल्यास, सल्फर (८० डब्ल्यूजी) २ ग्रॅम; तसेच ढगाळ, पावसाळी वातावरण असल्यास, करपा नियंत्रणासाठी कार्बेन्डाझीम + मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) १ ग्रॅम प्रतिलिटर पाणी प्रमाणे मिसळून फवारावे.
4️⃣ फवारणी- तिसऱ्या फवारणीनंतर १५ दिवसांनी, थायमेथोक्झाम (२५ डब्ल्यूजी) ०.१ ग्रॅम प्रतिलिटर पाणी प्रमाणे फवारणी करावी.
5️⃣ फवारणी- चौथ्या फवारणीनंतर १५ दिवसांनी, डायमेथोएट (३० ईसी) १ मि.लि. किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन (५ ईसी) ०.६ मि.लि. प्रतिलिटर पाणी प्रमाणे फवारणी करावी.
6️⃣ फवारणी- पाचव्या फवारणीनंतर १५ दिवसांनी, (तुडतुड्यांचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीवर असल्यास) पाचव्या फवारणीसाठी सुचविलेल्या कीटकनाशकांपैकी न वापरलेल्या कीटकनाशकाची फवारणी करावी.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.