डाळिंब
हस्त बहार
अन्नद्रव्य व्यवस्थापन
✨ बागेची अवस्था - फुलधारणा/ फळधारणा
👉चांगली फुलधारणा व फळधारणा यासाठी नॅप्थलिन असेटिक असिड (एनएए) २२.५ मि.लि. प्रति १०० लिटर पाणी याप्रमाणे फवारावे.
👉सक्ष्म अन्नद्रव्याचे मिश्रण ४००-६०० ग्रॅम प्रति एकर याप्रमाणे फवारावे.
👉नत्रःस्फुरद:पालाश ००:५२:३४ (मोनो पोटॅशियम फॉस्फेट) ३.४ किलो प्रति एकर याप्रमाणे सात दिवसांच्या अंतराने तीनवेळा ड्रिपमधून दयावे.
👉जिप्सम १.४० किलो प्रतिझाड आणि मॅग्नेशियम सल्फेट ३०० ग्रॅम प्रतिझाड याप्रमाणे जमिनीतून दयावे व त्यानंतर बागेस पाणी दयावे.
✨ बागेची अवस्था - फळधारणा पूर्ण झाल्यानंतर
👉नत्रःस्फुरद:पालाश ००:५२:३४ (मोनो पोटॅशियम फॉस्फेट), युरिया आणि ००:००:५० अनुक्रमे ३.४, ९ आणि ६.५ किलो प्रति एकर याप्रमाणे सात दिवसांच्या अंतराने पाचवेळा ड्रिपदवारे दयावे.
👉सक्ष्म अन्नद्रव्यांची ४००-६०० ग्रॅम प्रति एकर याप्रमाणे फवारणी करावी.
👉जिब्रेलिक अॅसिड हे ५० पीपीएम याप्रमाणे १५ दिवसांच्या अंतराने दोनवेळा फवारावे.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.