कोबी वर्गीय पिके
रोग नियंत्रण
⭕️ घाण्या
प्रथम पानाच्या कडेला पिवळेपणा येतो. नंतर तो कडेपासून पानाच्या आतील भागाकडे वाढत जाऊन शेवटी ‘V’ आकाराचा पट्टा पडतो. हा डाग किंवा चट्टा पानाच्या मुख्य शिरेपर्यंत पसरत जाऊन प्रादुर्भावग्रस्त भाग तपकिरी पडतो. रोगग्रस्त भागातील पानाच्या शिरा काळ्या पडतात. रोगग्रस्त भाग मोडल्यास त्यातून दुर्गंधीयुक्त काळसर द्रव निघतो. रोग गड्डा आणि मुळापर्यंत पसरल्यास कोबी, फ्लॉवरचे गड्डे पूर्णपणे सडून जातात. रोगाचा प्रादुर्भाव लागवडीनंतर त्वरित झाल्यास रोगग्रस्त रोप मरते.
🛡️ उपाययोजना
👉रोगग्रस्त पाने काढून नष्ट करावीत.
👉कॉपर ऑक्झिक्लोराईड ३ ग्रॅम अधिक स्ट्��ेप्टोसायक्लीन ०.१ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून दहा दिवसांच्या अंतराने दोन ते तीनवेळा फवारणी करावी.
⭕️ करपा
रोगाचा प्रादुर्भाव बियाणे व रोगग्रस्त अवशेषांपासून होतो. प्रसार कीटक आणि हवेमार्फत होतो. प्रादुर्भावग्रस्त गड्डा, देठ आणि खोडावर गोलाकार किंवा लंबगोल काळसर रंगाचे डाग दिसतात. पानावर वलयांकित तपकिरी काळे ठिपके पडतात. ढगाळ हवामानात रोगाची तीव्रता वाढून हे डाग एकमेकांत मिसळतात. सर्व भाग काळपट पडून पाने करपल्यासारखी दिसतात. कोबी, फ्लॉवरच्या गड्ड्यांवर रोगाचा प्रादुर्भाव होऊन गड्डे तपकिरी रंगाचे होतात.
🛡️ उपाययोजना
👉रोगग्रस्त झाडांचा उपटून नायनाट करावा.
👉मन्कोझेब २.५ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड २.५ ग्रॅम किंवा क्लोरथॅलोनील २.५ ग्रॅम अधिक स्टीकर १ मि.लि. प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.