टोमॅटो आठवडी सल्ला | तण व्यवस्थापन |

 टोमॅटो

टोमॅटो पुनर्लागवडीनंतर आवश्‍यकतेनुसार खुरपण्या करून पीक तणविरहित ठेवावे. टोमॅटोच्या पिकात तणनाशकाचा वापर करावयाचा झाल्यास, रोपांच्या पुनर्लागवडीपूर्वी कोरड्या वाफ्यात पेंडिमिथॅलिन (३० ईसी) १ लिटर प्रति एकर या प्रमाणात फवारणी करावी. फवारणीनंतर पाणी देऊन पुनर्लागवड करावी. अन्यथा पुनर्लागवडीनंतर १६ ते २० दिवसांनी मेट्रीब्युझीन (७० डब्ल्यूपी) या तणनाशकाची ३०० ग्रॅम प्रति एकर या प्रमाणात नॅपसॅक पंपाने फ्लॅट फॅन किंवा फ्लड जेट नोझल वापरून तणांवर फवारणी करावी. फवारणीवेळी जमिनीत पुरेसा ओलावा असावा.


कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post