कांदा रब्बी (उन्हाळ) कांदा रोपवाटिका

 कांदा-लसूण

रब्बी (उन्हाळ) कांदा रोपवाटिका 

पेरणीनंतर २० दिवसांनी हाताने खुरपणी करावी. खुरपणीनंतर दोन गुंठे (२०० वर्ग मीटर) क्षेत्रासाठी ८०० ग्रॅम नत्र द्यावे. ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धतीने पाणी द्यावे. 

⚔️ रोपवाटिकेतील कीड व रोग नियंत्रण 

👉 फुलकिडे (फवारणी प्रति लिटर पाणी) 

फिप्रोनिल १ मि.लि. किंवा प्रोफेनोफॉस १ मि.लि. किंवा कार्बोसल्फान २ मि.लि. 

👉 मर व मातीतून पसरणारे रोग 

मेटॅलॅक्झील + मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात रोपांच्या ओळींत द्रावण ओतावे. 

👉 काळा करपा (फवारणी प्रति लिटर पाणी) 

मॅन्कोझेब २.५ ग्रॅम 

👉 तपकिरी व जांभळा करपा (फवारणी प्रति लिटर पाणी) 

ट्रायसायक्लॅझोल १ ग्रॅम किंवा हेक्झाकोनॅझोल १ मि.लि. 

*फवारणीवेळी ०.५ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे स्टीकर वापरावे.

कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

Post a Comment (0)
Previous Post Next Post