आंबा
हापूस आंब्यामध्ये झाडाच्या टोकाकडील भागात जास्त पालवी, फांद्या असल्यास झाडाच्या आतील बाजूस सूर्यप्रकाश पोहोचत नसल्याने, नवीन पालवी व फळधारणेवर परिणाम दिसून येतो. यासाठी गच्च झाडांची मध्य फांदी छाटणी व काही घन फांद्यांची विरळणी करून घ्यावी. कापलेल्या भागावर बोर्डो पेस्ट लावावी.
घन लागवड (५ x ५ मीटर किंवा ६ x ४ मीटर) असलेल्या आंबा बागांमध्ये सुरुवातीच्या काळापासून नियमित छाटणी करावी. यामध्ये उंची कमी करणे, फांद्या एकमेकांमध्ये गेल्या असल्यास छाटणे आणि वाळलेल्या फांद्या काढून टाकणे या गोष्टींचा अंतर्भाव करावा. घन लागवड असलेल्या बागांमधील कलमांची उंची दोन ओळींच्या अंतराच्या ८० टक्के इतकी ठेवावी.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.