संत्रा-मोसंबी-लिंबू
पीक संरक्षण
⭕️ रोग नियंत्रण
👉 देठकूज
प्रादुर्भावग्रस्त झाडांवर, कार्बेन्डाझीम (५० डब्ल्यूपी) १ ग्रॅम किंवा थायोफेनेट मिथाईल (७० डब्ल्यूपी) १ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून १० दिवसांच्या अंतराने दोनवेळा फवारणी करावी.
👉 फायटोफ्थोरा
फायटोफ्थोराग्रस्त झाडांवर, मेटॅलॅक्झिल एम + मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) २.७५ ग्रॅम किंवा फोसेटील एएल (८० डब्ल्यूपी) २.५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे संपूर्ण झाड ओले होईपर्यंत फवारणी करावी. हे द्रावण झाडाभोवतीही ओतावे. झाडाच्या बुंध्यावर दोन फुटांपयत बोर्डो पेस्ट ब्रशने लावून घ्यावी.
⭕️ कीड नियंत्रण
👉 फळांतील रस शोषणारा पतंग
पतंगांना आकर्षित करून मारण्यासाठी प्रति दोन लिटर पाण्यात २० मि.लि. मॅलॅथिऑन अधिक २०० ग्रॅम गूळ किंवा फळांचा रस मिसळून विषारी मिश्रण तयार करावे. हे मिश्रण मोठ्या तोंडाच्या बाटलीमध्ये ठेवून, झाडांवर अडकवून ठेवाव्यात. गळालेली फळे एकत्र करून मातीत गाडून नष्ट करावीत.
👉 फळमाशी
नर माशीला आकर्षित करण्यासाठी ०.५ मि.लि. मिथाईल युजेनॉल अधिक ०.५ मि.लि. मॅलॅथिऑन (५० ईसी) यांचे प्रतिलिटर पाण्यात मिश्रण करावे. हे मिश्रण रुंद तोडाच्या बाटलीत ठेवावे. फळतोडणीच्या आधी साठ दिवसांपासून अशा बाटल्या एकरी १० या प्रमाणात बागेत लावाव्यात. त्याकडे नरमाशा आकर्षित होऊन बळी पडतात. बाटलीतील कीटकनाशकाचे द्रावण दर सात दिवसांनी बदलावे.
👉 कोळी
प्रादुर्भाव दिसताच, डायकोफॉल (१८.५ ईसी) २ मि.लि. किंवा प्रोपरगाईट (५७ ईसी) १ मि.लि. किंवा सल्फर (८० डब्ल्यूजी) ३ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. आवश्यकता भासल्यास दुसरी फवारणी १५ दिवसांच्या अंतराने घ्यावी.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.