पूर्वहंगामी ऊस लागवड पद्धत

पूर्वहंगामी ऊस

लागवड पद्धत 

लांब सरी पद्धत 

👉 जमिनीच्या प्रकारानुसार सरीमधील अंतर ठेवावे. जमिनीच्या उतारानुसार सरीची लांबी ठेवावी. जमिनीच्या उतारानुसार ४०-६० मीटरपर्यंत सरीची लांबी ठेवावी. पाणी देताना दोन ते तीन सऱ्यांना एकत्र पाणी दयावे. जमिनीचा उतार ०.३-०.४ टक्क्यांपर्यंत असेल तर उताराच्या दिशेने सरी काढावी. उतार ०.४ टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास उताराला आडव्या सऱ्या पाडून ऊस लागवड करावी. सलग पद्धतीमध्येसुद्धा ठिबक सिंचनाचा वापर करावा. टंचाईच्या काळात सरी आड सरी पाणी देणे या पद्धतीत फायदेशीर ठरते. 

👉 या पध्दतीमध्ये आवश्यक तेवढेच पाणी देता येते. पिकाची वाढ जोमदार होते. लांब सरीमुळे जास्तीत-जास्त क्षेत्राचा वापर होतो. उत्पादनात वाढ होते. आंतरमशागत सुलभतेने करता येते. 

पट्टा पद्धत 

👉जमिनीच्या प्रकारानुसार पट्टा पद्धतीने लागवड करावी. मध्यम जमिनीत २.५ फूट व भारी जमिनीत ३ फूट अंतरावर रिझरच्या सहाय्याने सलग सऱ्या पाडून दोन सऱ्यांमध्ये लागवड करून तिसरी सरी मोकळी सोडावी. म्हणजे दोन जोडओळीत ५ फूट किंवा ६ फूट पट्टा रिकामा राहील. 

👉ठिबक सिंचन आणि अधिक उत्पादनासाठी ही पध्दत फायदेशीर आहे. या पध्दतीत भरपूर सूर्यप्रकाश व हवा मिळाल्यामुळे उसाची वाढ जोमदार होते. ऊस पिकावर अनिष्ठ परिणाम न होता आंतरपिकाचे उत्पादन मिळते. तणांचा प्रादुर्भाव कमी दिसतो. 

👉यांत्रिकीकरणासाठी ही पध्दत योग्य आहे. यंत्राच्या सहाय्याने ऊसतोडणी करता येते. पट्ट्यामुळे पीक संरक्षण चांगल्या पध्दतीने करता येते. ऊस बांधणीनंतर दोन ओळींमध्ये एक सरी तयार होते, त्या सरीला पाणी देऊन उसाच्या दोन्ही ओळी भिजविता येतात. त्यामुळे पाण्याची ४५% बचत होते.

कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post