आडसाली ऊस
ऊस लागवडीपूर्वी जीवाणू संवर्धकाची बेणेप्रक्रिया केली नसल्यास लागवडीनंतर दोन महिन्यांनी ४०० मि.लि. द्रवरूप ॲसिटोबॅक्टर २०० लिटर पाण्यात मिसळून सकाळच्या वेळेस फवारणी करावी आणि प्रति एकरी ०.५ किलो स्फुरद विरघळणारे जीवाणू संवर्धक ४० किलो कंपोस्ट खतामध्ये मिसळून सरीमधून द्यावे.
ऊस पिकासाठी जेवढी मुख्य आणि दुय्यम अन्नद्रव्यांची आवश्यकता आहे, तेवढीच सूक्ष्म अन्नद्रव्यांची सुद्धा अवश्यकता असते. मल्टि मॅक्रोन्यूट्रीयंट (नत्र ८ %, स्फुरद ८ %, पालाश ८ %) आणि मल्टि मायक्रोन्यूट्रीयंट (ग्रेड-II : फेरस २.५ %, मँगेनीज १ %, झिंक ३ %, कॉपर १ %, मॉलीब्डेनम ०.१ %, बोरॉन ०.५ %) या द्रवरूप खताची एकरी प्रत्येकी २ लिटर प्रति २०० लिटर पाणी या प्रमाणात एकत्रित पहिली फवारणी लागणीनंतर ६० दिवसांनी आणि ३ लिटर प्रति ३०० लिटर पाणी या प्रमाणात दुसरी फवारणी ९० दिवसांनी केली असता उत्पादनात वाढ होते.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.