रब्बी मका
रब्बी हंगामात मका पेरणी १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत करावी. पेरणीसाठी एकरी ६ ते ८ किलो बियाणे लागते. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास थायरम हे बुरशीनाशक २.५ ग्रॅम आणि सायअॅन्ट्रानिलीप्रोल (१९.८ %) + थायमिथोक्झाम (१९.८ % एफएस) हे संयुक्त कीटकनाशक ४ मि.लि. या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. रासायनिक बीजप्रकियेनंतर, ॲझोटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळणारे जीवाणू संवर्धक प्रत्येकी २५ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. रब्बी हंगामात सरी-वरंबा पद्धतीचा अवलंब करावा. उशिरा व मध्यम कालावधीच्या जातींसाठी ७५ x २० सें.मी.; तर लवकर पक्व होणाऱ्या जातींसाठी ६० x २० सें.मी. अंतरावर सरीच्या बगलेत मध्यावर एका बाजूला टोकण पद्धतीने ४ ते ५ सें.मी. खोलीवर पेरणी करावी.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.